WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रामदेव बाबा अपंग मुकबधीर शाळेची भरारी कामगिरी

Image

सुरज चाटे वणी :- दिनांक 20 व 21 रोजी पोलीस कवायत मैदान यवतमाळ येथे झालेल्या जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत यावर्षी सुद्धा रामदेवबाबा अपंग मुकबधीर विद्यालय, चिखलगांव वणीचे विद्याथी जिह्यात सार्वधिक पदक अर्जित करण्याचा बहुमान मिळावलं. सर्वप्रथम उदघाटन कार्यक्रमात जि. प.अध्यक्ष माधुरीताई आडे,समाज कल्याण सभापती प्रज्ञाताई भूमकाळे,समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या हस्ते मागील वर्ष राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत यवतमाळ जिल्हा चा 3 रा पारितोषिक प्राप्त झाल्या बद्दल श्री रामदेव बाबा मुकबधीर विद्यालय वणीचे सचिव डॉ भंडारी सर व चमू यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Image

तद्नंतर स्पर्धांची सुरुवात झाली.मुकबधीर गटांत 200 धावण्यात ललिता मेश्राम,सपना बलकी,पूजा उईके यांनी प्रथम तर। द्वितीय स्थान। प्राप्त केले गोळा फेक मध्ये सपना बलकी व कोमल रोकडे यांनी सुवर्ण पदक जिंकले द्वितीय तसेच लांब उडी सीमा मेश्राम प्रथम स्थान प्राप्त केलें.. मुकबधीर गटात मुलींनी आपला वर्चस्व गाजवला. तर मतिमंद गटात स्पॉट बॉल थ्रोव मध्ये कामाक्षी चोपणे,धावण्यात अंकुश लांडे,दिव्या मडावी,गोळा फेक मध्ये अंकुश लांडे अजय गिरी,मुकुंदा रामपुरे, सुरक्षा घोटेकर ,लांब उडित सूचिता खिरटकर या सर्वांनी सुवर्ण पदक अर्जित केले.

एकूण मतिमंद गटात 8 सुवर्ण, रजत, व कांस्य पदक तसेच मुकबधीर गटात 6 सुवर्ण रजत व कांस्य पदक जिंकून वणी तालुकाचा नाव संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात गाजवला या यशाचा श्रेय शाळेचे संचालक दलितमित्र मेघराजजी भंडारी, चद्रभागाबाई बोधे,डा जिनेंद्र भंडारी तसेच कर्मचारी सरोज जैन,भरती हिवरे,सत्यवती शर्मा,विकी पेंदोर,प्रभा बोधे, मरकड यांचा परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......