WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यातील तीन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

Image

corona update २५ Nov.

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

तालुक्यात आज तीन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९४९ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८२ झाली आहे. आणखी दोन रुग्ण उपचारांती कोरोनातुन बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ८४४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर २३ रुग्ण कोरोनाने दगावले आहेत.

आज ११६ तपासणी अहवाल प्राप्त झाले असून एक पॉझिटिव्ह तर ११५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज ४५ रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या असून २ पॉझिटिव्ह तर ४३ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत एकूण ७१९४ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ३६३७ आरटीपीसीआर तर ३५५७ रॅपिड अँटीजेन चाचण्यांचा समावेश आहे. आज आणखी १३ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ६२ अहवाल प्रलंबित आहेत. आज तीन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८२ वर पोहचली आहे. पॉझिटिव्ह व्यक्तींपैकी ५० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, ७ व्यक्ती कोविड केयर सेंटरमध्ये तर २५ व्यक्ती यवतमाळ व इतरत्र उपचार घेत आहेत.

आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये वसंतगंगा विहार येथील एक, चिखलगाव येथील एक तर चोपण येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.