WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कुख्यात शेख हाजी चे हस्तक वणीत 'एटीएस' च्या ताब्यात ....

Image

वणी :- कुख्यात कोलमाफिया शेख हाजी याला अग्निशस्त्र तस्करीत नागपूरच्या दहशतवाद विरोधी पथकाने ३ फेब्रुवारी रोजी वर्धा जिल्ह्यातील गिरड येथून अटक केल्यानंतर या पथकाने त्याचे आणखी साथीदार मंगळवारी रात्री भालर येथील जितेंद्रसिंग सज्जनसिंग याला तर गुरुवारी मंगेश उखणकर याला वणी बस स्थानक परिसरात अटक केली. चौकशीदरम्यान त्याच्याजवडून पिस्तूल व मोठ्या प्रमाणात काडतूस जप्त केले.

२४ जानेवारीच्या रात्री बिहारमधून २ पिस्तूल तसेच २० काडतूस घेऊन नागपुरात आलेल्या सुपतसिंग (रा.बिहार) आणि संजय संदीपान खरे (रा. वडगाव यवतमाळ) या दोघांना एटीएसने जेरबंद केले होते. चौकशीत या दोघांनी पिस्तूल आणि जिवंत काडतूस कोलमाफिया शेख हाजी याच्यासाठी आणल्याचे सांगितले होते. तेव्हापासून एटीएस चे पथक हाजीचा शोध घेत होते अखेर ३ फेब्रुवारी रोजी गिरड येथून त्याला अटक करण्यात अली. त्यानांतर त्याचा पी सी आर घेतला असता. वणी परिसरातून त्याचे अनेक साथीदार त्याला सहकार्य करत असल्याची बाब उघड झाली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.