WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

बनावट नोटांचे रॅकेट वणीत उघड ?

Image

एकास अटक ...तीन फरार, शोध सुरु.....

वणी शहरात बनावट नोटा चलनात आणणारी मोठी टोळी सक्रिय असून या टोळीतील महादेव खिरटकर (रा. वणी ) याला चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी आठवडी बाजारात रंगेहाथ पकडले.त्याच्या जवडून ५० आणि १०० रु. याच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. कोठारी बाजारात बनावट नोटा चलनात आणण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी साध्या वेशात सापळा रचून महादेव खिरटकर याला ताब्यात घेतले. त्याचे तीन सहकारी अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले