WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

माय-बापांनो, मुला- मुलींना सांभाळा…..... पोलिसांचे पालकांना आवाहन...

Image

टीव्हीतील चित्रपटांचा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांवरच प्रभाव असतो. परंतु अल्पवयीन कोवळ्या मुला-मुलींवर याचा गंभीर परिणाम होताना दिसतो. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका चिमुरड्या मुलीने तिच्या प्रियकराला लिहिलेले भावनिक पत्र वाचून पोलीसदेखील चक्रावले आहेत. शुक्रवारी रामदासपेठ पोलीस ठाण्यातील पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. या प्रकाराने ‘माय-बापांनो, मुली सांभाळा…’ अशी म्हणण्याची वेळ आल्याचं दिसत आहे.

नेमकी घटना काय ?

शुक्रवारी दुपारी मोठ्या उमरीतील पालकांंनी पोलिसात तक्रार दाखल केली की, एक अल्पवयीन मुलगा त्यांच्या मुलीला त्रास देतो, शाळेजवळ जाऊन छेड काढतो. या तक्रारीनंतर याची दखल घेत पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले आणि त्याला समजही दिली. यानंतर त्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, मुलगीच आपल्याला रात्री-मध्यरात्री फोन करते. भेटायला बोलावते. प्रेमपत्र लिहिते. त्याच्या या खुलाशानंतर त्या मुलाने तिचे मेसेज आणि पत्र पोलिसांना दाखवले. त्यात जे काही समोर आले ते वाचून तर पोलीस चक्रावूनच गेले. तिने लिहिले होते की, पिल्लू…लव्ह यू…तू जेवण कर…नाहीतर मीसुद्धा जेवण करणार नाही….आपण पळून जाऊ, खोली करू… संसार थाटू. मुख्य म्हणजे असे एक नाही, तर अनेक भावनिक पत्रे लिहिली होती. इयत्ता आठवी-नववीत शिकणारी ती मुलगी असल्याचे समजत आहे.

पोलिसांनी यानंतर त्या अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांनासुद्धा बोलावून घेतले. त्यांना सर्व प्रकार सांगत त्यांना समज दिली. त्यानंतर मुलावरही कारवाई करत त्याला सोडून दिले. याशिवाय पोलिसांनी संबंधित मुलीच्या आई-वडिलांचे, मुलीचे समुपदेशन करून मुलांवर लक्ष ठेवण्यास बजावले.

पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष

दरम्यान, पालकांनी मुलांबाबत थोडे दक्ष राहणे गरजेचे आहे. आपली मुले-मुली कोणाशी बोलतात कोणाशी नाही, त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बऱ्याचदा पालक मुलांकडे लक्ष देत नाहीत. मग नको नको ते प्रकार समोर येतात आणि त्यानंतर पालकांना जोराचा धक्का बसतो. परंतु तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. १३-१४ वर्षे वयाची मुलगी तिच्या प्रियकराला भावनिक पत्र लिहिते आणि त्यात पिल्लू तुला काय झालं. राग आला, तू बोलत का नाहीस. पिल्लू जेवला नाहीस…! असं म्हणते. तोपर्यंतही पालकांना काहीच कळू नये. यावरून पालक किती दुर्लक्ष करतात, हे दिसून येते.

शाळा-महाविद्यालयांसमोर टपोरी मुलांचा वावर

आपण अनेकदा पाहिले असेल की, शहरातील अनेक शाळा-महाविद्यालयांसमोर टपोरी मुले धुमाकूळ घालताना दिसून येते रोड रोमिओनवर कारवाईची गरज निर्माण झाली असून अशा रोड रोमिओ मुळे चांगले मूल मुली सुद्धा बदनाम होऊ शकते, त्यामुळे यावर कारवाई होणे आवश्यक असल्याचे सुद्धा बोलल्या जात आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.