WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मोहर्ली येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

तालुक्यातील आत्महत्यांचे सत्र थांबता थांबत नसून एकामागून एक होणाऱ्या आत्महत्यांनी तालुका हादरला आहे. आज आणखी एका इसमाने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची घटना शहरापासून काही अंतरावर असलेल्या मोहर्ली गावात घडली आहे. सकाळी ७ वाजताच्या सुमारास गावातील लोकांना सदर इसम झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. राजेंद्र मेश्राम (४०) असें या गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असून तो मूळचा मेंढोली येथील रहिवासी असल्याचे समजते. मागील १५-१६ वर्षांपासून तो मोहर्ली येथे परिवारासह रहात असून कोणतेही मजुरीचे काम करून प्रपंच चालवीत असल्याचे समजते.

तालुक्यातील मोहर्ली येथील राजेंद्र मेश्राम या चाळीस वर्षीय मजूर म्हणून काम करणाऱ्या इसमाने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्या मुलीने स्वमर्जीने विवाह केल्याचे समजते. आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेण्यामागचे कारण अद्याप कळू शकले नसून पोलीस तपासात खरं काय ते स्पष्ट होईल. मानसिक खच्चीकरणातून आत्महत्येसारखा पर्याय निवडून जीवनातून मुक्त होण्याचे प्रकार आता चांगलेच वाढू लागले आहे. सतत होणाऱ्या आत्महत्यांनी तालुका हादरला आहे. राजेंद्र मेश्राम याच्या या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले