WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरातील विविध कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

शहरातील विविध शाळा महाविद्यालय व शासकीय प्रशासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वजारोहण करून ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शासकीय मैदान (पाण्याची टंकी) येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत गायनाने राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पीएसआय शिवाजी टिपूर्णे यांच्या नेतृत्वात पथसंचलन पार पडले. दरवर्षी प्रजासत्ताक दिना निमित्त शासकीय मैदानावर शहरातील शाळा व विद्यालयांच्या वतीने निरनिराळे सांस्कृतिक कार्यक्रम व कवायती सादर करण्यात येतात. परंतु कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक सत्र बंद राहिल्याने यावर्षी शाळा व विद्यालयाचे सांस्कृतिक कार्यक्रम व कवायती शहरवासीयांना पाहायला मिळाल्या नाही. प्रजासत्ताक दिनाला साक्षी मानून यावेळी सर्व उपस्थितांनी धूम्रपान न करण्याची व शहर स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR