WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जागृत पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी संदिप बेसरकर तर सचिव पदी मो. मुस्ताक यांची निवड

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

जागृत पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी संदिप बेसरकर तर सचिव पदी मुस्ताक यांची निवड करण्यात आली आहे. काल २० फेब्रुवारीला स्थानिक विश्राम गृह येथे जागृत पत्रकार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष राजू धावंजेवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभेत जागृत पत्रकार संघाची नविन कार्यकारणी गठीत करण्यात आली. यात सर्वानुमते संदिप बेसरकर यांची अध्यक्षपदी तर मोहम्मद मुस्ताक यांची सचिव पदी निवड करण्यात आली.

मागील अनेक वर्षांपासून जनहितासाठी कार्यरत असलेल्या जागृत पत्रकार संघाने अनेक उपक्रम राबविले आहेत. या पत्रकार संघाचे विदर्भीय अध्यक्ष राजू धावंजेवार यांच्या मार्गदर्शनात जागृत पत्रकार संघाची योग्य वाटचाल सुरु आहे. त्यांच्या अध्यक्षतेत जागृत पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संदिप बेसरकर यांची तर अन्य कार्यकारणीमध्ये सचिव मोहम्मद मुस्ताक, उपाध्यक्ष विवेक तोटेवार, सहसचिव पुरुषोत्तम मोटघरे, सदस्य मुन्ना बोथरा, श्रीकांत किटकुले, गणेश रांगणकर, आकाश दुबे, रफिक शेख, प्रविण नैताम, मनोज नवले, प्रशांत चंदनखेडे, राहुल अहुजा यांचा समावेश आहे. जागृत पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार म्हणून ऍड. अमोल टोंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.