WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

उत्कृष्ट अध्यापक पुरस्काराचे मानकरी गजानन कासावार .....तिसरे वर्ष, पुरस्कार जाहीर

Image

राम शेवाळकर स्मृती दिनी दिला जाणार पुरस्कार...

सुरज चाटे वणी - जैताई देवस्थान वणी शिक्षण समिती द्वारा दर वर्षी पू. मामा क्षीरसागर स्मृती दिनी दिला जाणारा प्रा. राम शेवाळकर स्मृती उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार या वर्षी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नगर परिषद शाळा क्र. 5 चे मुख्याध्यापक गजानन कासावार ह्यांना दिला जाणार असल्याचे एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे देवस्थानचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला व सचिव माधव सरपटवार ह्यांनी जाहीर केले आहे. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. पुरस्काराचे स्वरूप 2500 रूपये रोख , स्मृतिचिन्ह आणि शाल व श्रीफळ असे आहे.

कासावार ह्यांना पुरस्कार दि. 6 एप्रिल 2019 शनिवार रोजी रात्री 7.30 वाजता जैताई मंदिराच्या प्रांगणात समारंभपूर्वक दिला जाणार आहे. पुरस्कार 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा. डाॅ. रमाकांत कोलते यांच्या हस्ते दिला जाणार आहे.या प्रसंगी डाॅ. कोलते 'शिक्षक : एक उर्जास्त्रोत ' या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. कासावार यांची ज्ञाननिष्ठा , विद्यार्थीनिष्ठा व समाजनिष्ठा लक्षात घेऊन मंदिराने हा पुरस्कार त्यांना देण्याचे ठरविले आहे. तरी या कार्यक्रमाला बंधुभगिनींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी विनंती आयोजक संस्थेने केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.