WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कासावार यांना शेवाळकर उत्कृष्ठ अध्यापक पुरस्कार

Image

सुरज चाटे वणी - येथील जैताई मंदिराच्या शिक्षण विभागातर्फे मागील तीन वर्षांपासून मामा क्षीरसागर यांच्या पुण्यतिथी निमित्त 6 एप्रिलला प्राचार्य राम शेवाळकर उत्कृष्ठ अध्यापक पुरस्कार देण्यात येत आहे. या वर्षीचा हा पुरस्कार येथील सावरकर शाळेचे मुख्याध्यापक गजानन कासावार यांना जेष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. रमाकांत कोलते यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, 2500/- रुपये रोख व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्षस्थानी मंदिराचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविक देवस्थान समितीचे सचिव माधव सरपटवार यांनी केले

गजानन कासावार यांना 2010 मध्ये महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार, 2005 मध्ये बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार, 2018 मध्ये सावरकर रत्न पुरस्कार मिळाला आहे. विद्यार्थी व शाळेप्रति नितांत श्रद्धा असलेले कासावार त्यांच्या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध प्रकारचे उपक्रम राबवित असतात. त्यांच्या विद्यालयातून अनेक विद्यार्थ्यांची निवड नवोदय विद्यालयासाठी व शिष्यवृत्तीसाठी झाली आहे. त्यामुळे एक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचे योगदान मोठे आहे. ते येथील अ दर्जा प्राप्त नगर वाचनालयाचे सचिव आहेत. विदर्भ नगर परिषद शिक्षक संघाचे ते केंद्रीय कार्यध्यक्ष आहेत. विदर्भ साहित्य संघाच्या वणी शाखेचे उपाध्यक्ष आहेत. सहज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. मागील 18 वर्षांपासून सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना समितीच्या माध्यमातून समाज सहभागाद्वारे दरवर्षी 200 ते 225 मुलींना दत्तक घेऊन त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात येऊन कोणतीही मुलगी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहू नये याची काळजी घेतल्या जाते.

कोणत्याही पुरस्कारापेक्षा जैताई मंदिरातर्फे राम शेवाळकर यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी मोलाचा आहे अशी प्रतिक्रिया गजानन कासावार यांनी या प्रसंगी व्यक्त केली. त्यानंतर प्रा. रमाकांत कोलते, नरेंद्र नगरवाला, प्रा. स्वानंद पुंड यांची समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी गुलाबराव खुसपुरे, नामदेव पारखी यांनी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.