WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी शहरात चोरांचा तांडव....

Image

धाडसी चोऱ्या :- शहराच्या मध्यभागी चोरांनी फोडली 5 दुकाने.....

सुरज चाटे - वणी शहर हे परिसरातील नागरिकांचे नेहमीचे वर्दळीचे शहर असून वणी शहरात एकाच राञी पाच वेगवेगळ्या ठिकाणी ऐन चौकाच्या ठिकाणी या चोऱ्या झाल्याने चोराने धाडसी चोरी केल्याचे दिसून येत आहे. या चोऱ्यात दुकाने फोडुन चोरट्यांचे पोलीसांना आवाहनच दिसून असून ही घटना दिनांक 1 मे च्या पहाटे उघडकीस आली आहे त्यामुळे व्यापारी चिंतेत दिसून येत आहे.

सध्या स्थितीत लग्नसराई सुरू असल्याने व्यापारी वर्ग आपआपली दुकाने संपूर्ण मालासह सज्ज ठेवतात म्हणजे आपला येणारा ग्राहक ज्या मालाची मागणी करणार तो माल त्याला देता आला पाहिजे त्यातच दिनांक 1 ला पहाटेच्या दरम्यान जे उघडकीस आले ते काही वेगळेच होते यात वणीच्या मध्यभागी समजल्याजाणारे आंबेडकर चौकातील पालीका मार्केट मधील दुसर्या माळ्यावर असलेले सुनिल आक्केवार यांचे (बोनी टेलर)दुकान, दुसरे दुकान याच मार्केट मधिल महेश गोलाईत यांचे विजय बारदाना सेंटर,याच पालीका मार्केट समोरील मोना ईलेक्टी्क दुकान,महाराष्ट् बँक चौकातील तणीष्का मोबाईल,टागौर चौकातील विठ्ठलदास देवचंद भाटीया यांचे शोरुम चे दुकान असे एकुन पाच दुकानांच्या शटर चे ताळे तोडुन चोरट्यांनी आत प्रवेश केला. या चोरीच्या घटनेत व्यापार्यांचे काही प्रमाणात का होईना नुकसान झाले असून, शहरातील मध्यभागी असलेल्या चौकात पाच ठिकाणी चोरी झाल्याने आता व्यापारी वर्ग चांगलाच संतापला असून वणी पोलिसांपुढे या चोरांना पकडण्याचे आवाहनच बनले आहे, तर याचा तपास वणी पोलीस करीत असून अजून पर्यंत यात नुकसान किती झाले हे अजून स्पष्ट नसले तरी अशा या चोरांच्या मुसक्या आवळणे आवश्यक झाले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR