WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

एका छोट्याशा गावातून थेट आयआयटी गुवाहाटीपर्यंत — स्नेहा राजेंद्र काकडेचा प्रेरणादायी प्रवास!

Image

चंद्रपूर जिल्ह्यातील स्मार्ट ग्राम बिबी या छोट्याशा गावात जन्मलेली स्नेहा राजेंद्र काकडे हिने आपल्या मेहनत, चिकाटी आणि कलात्मक प्रतिभेच्या जोरावर भारतातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी गुवाहाटीमध्ये मास्टर ऑफ डिझाईन या प्रतिष्ठित पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी यशस्वी प्रवेश मिळवला आहे.

स्नेहा ही केवळ एक गुणवंत विद्यार्थिनी नाही, तर एक असामान्य प्रतिभेची चित्रकारसुद्धा आहे. ती कोणाचाही चेहरा अत्यंत हुबेहूब रंगवू शकते – तिच्या हातातील चित्रांना प्राण असतो. तिच्या चित्रांमध्ये इतकी सजीवता आहे, की पाहणाऱ्याला वास्तवाचा भास होतो. अशा प्रतिभावान कलाकाराची निवड देशभरातील हजारो उमेदवारांमधून फक्त काही निवडक विद्यार्थ्यांमध्ये झाली, हेच तिच्या मेहनतीचे आणि गुणवत्ता सिद्ध करण्याचे मोठे उदाहरण ठरते.

गावात मर्यादित सुविधा असतानाही स्नेहाने आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा थांबवला नाही. तिने अभ्यास, सराव आणि स्वतःवरील विश्वासाच्या जोरावर ही मोठी झेप घेतली आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण बिबी गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे.

गावकरी, शिक्षक, मित्रपरिवार आणि संपूर्ण परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्नेहाने दाखवून दिलं की गाव लहान असलं, तरी स्वप्न मोठं असावं – आणि ते पूर्ण करण्यासाठी मेहनत आणि आत्मविश्वास हाच खरा मार्ग आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले