WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रास्त भाव दुकानदाराकडे पुरवठ्याचा ठणठणाट....

Image

अर्धा महिना लोटूनही धान्य मिळेना :- धान्य दुकानात ग्राहकांच्या खेपा वर खेपा, घरचा गृहमंत्री अडचणीत....

सुरज चाटे - वणीतील रास्त धान्य दुकानात या महिन्याचे राशन अर्धा महिना होऊन सुद्धा आले नसून सध्यास्थितीत ग्राहकांच्या रास्त भाव धान्य दुकानावर खेपा वर खेपा मारणे सुरू असून यामुळे मात्र घरची गृहमंत्री संतापात असून महिना चालवायचा कसा? असा प्रश्न घरच्या महिलावर्गात असून राशन नसल्याने व हाताला काम नसल्याने आता रास्त भाव दुकानात विचारणा केली असता गोडाऊन मध्ये माल नसल्याचे सांगण्यात येते मात्र नेमकी परिस्थिती काय? रास्तभाव दुकान फक्त नावापूरतेच काय? असा सवाल याठिकाणी उपस्थित होत असून संबंधित विभागाने याची दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

वणी शहरातील रास्त भाव दुकानात अजून पर्यंत चालू महिन्याचे अनाज पोहोचले नसून गरीब वर्ग त्यामुळे चांगलाच अडचणीत सापडला आहे त्यामुळे घरच्या गृहमंत्र्याचे बजेट बिघडल्याचे दिसून येत असून आता महिन्याचा गाडा चालवायचा कसा? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे हाथाला काम नाही तर दुसरीकडे हाथावर आणून पानावर खाणे ही परिस्थिती असून रास्त भाव दुकान हे गोर गरीब जनतेच्या सेवेकरिता असल्याने कमी भावात त्यांना आनाज पुरवठा करण्याचे शासन आदेश असून सुद्धा आज चालू महिन्याची 21 तारीख असून सुद्धा रास्त भाव दुकानात अजून मालाचा ठणठणाट दिसून येत असून गरजू सदर ठिकाणी खेपावर खेपा मारीत असून सुद्धा आता अर्धा महिना गेला मग धान्य मिळणार तरी केव्हा? यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत असून आता संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे तसेच काही रास्त भाव दुकानधारक ग्राहकांना मशिनद्वारे मालाचे निघालेले बिल सुद्धा देत नसल्याचे बऱ्याचदा दिसून येत असून आता वरिष्ठ यावर कोणते निर्णय घेणार याकडे गोरगरीब जनतेचे लक्ष लागले असून अखेर पुरवठा होणार तरी केव्हा असे लाभार्थ्यांकडून बोलल्या जात आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.