WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीतील देह व्यापार प्रकरण : उच्च न्यायालयाच्या निर्देशावरून पोलीस तपास सुरु

Image

प्रेम नगर परिसरातून देहविक्री प्रकरणात ताब्यात घेतलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या खऱ्या जन्मदात्याचा शोध घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले. त्यानंतर वणी पोलिसांनी जन्मदात्याचा शोध घेण्यासाठी सदर मुलगी आपलीच असल्याचा दावा करणाऱ्या मध्यप्रदेशातील एका महिलेची डीएनए चाचणी घेतली आहे. नागपूर येथील एका स्वयंसेवी संस्थेने २०१८ रोजी वणी येथील प्रेम नगर परिसरात देह व्यापारात गुंतलेल्या मुलीची सुटका करून तिला महिला वसतिगृहात पाठविले. या मुलीची सुटका केल्यानंतर मध्यप्रदेशातील एका महिलेने 'ती' मुलगी आपली असल्याचा दावा करून तिचा ताबा मिळवण्याकरिता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु सदर मुलीने हि आपली आई नसल्याचे सांगितले. यावरून न्यायालयाने तिच्या खऱ्या आईवडिलांचा शोध घेण्याचे निर्देश वणी पोलिसांना दिले. मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती काही लागले नाही त्यामुळे त्या महिलेच्या रक्ताचे नमुने डीएनए तपासणीसाठी हैद्राबादला पाठविण्यात आले आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.