WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा व गुणगौरव सत्कार कार्यक्रम संपन्न

ImageImageImageImageImageImage

वणी: येथील माजी शासकीय माध्यमिक विद्यालय,वणी येथे सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांचा गुणगौरव सत्कार कार्यक्रमाचे आयोजन गो ग्रीन क्लब तर्फे करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.भारत जी चिव्हाणे सर, प्रमुख अतिथी म्हणून सत्कार मुर्ती मा.कुरले सर,मा.मारोती जिवतोडे तथा कार्यशाळेचे मार्गदर्शक म्हणून जंगले सर उपस्थित होते.

गो ग्रीन क्लब या संघटनेमार्फत सत्कार मुर्ती मा. कुरले सर,मा.मारोती जिवतोडे सर,मा.विक्की जंगले सर यांचा पुष्पगुच्छ,झाडाचे रोपटे प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.

मोत्यासारखे अक्षर,

वक्त्यासारखे बोल,

त्याचे जीवन अनमोल...

स्पर्धेच्या धकधकीच्या जीवनात हस्ताक्षर कला संपन्नता अतिमहत्वाची आहे.यासाठी विक्की जंगले सर यांच्या मार्गदर्शनात सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा वणी शहरात घेण्यात आली.या कार्यशाळेला बहुसंख्य विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. कार्यक्रमाचे संचालन मा. हर्षदा चोपणे ताई यांनी केले,प्रास्ताविक गो ग्रीन क्लबचे अध्यक्ष चचाने सर यांनी केले.तर आभार प्रदर्शन महेश लिपटे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्रजी साखरकर सर,तुरारे सर,मेश्राम सर,संदिप तलसे,चौधरी सर,लोंढे सर,म्हसे सर या सर्वांनी परीश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले