WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पाटनबोरी येथील विधुत ग्राहकांच्या समस्या साठी ग्राहकांचा मेळावा घेणार ! मंगेश वैद्य !

Image

पांढरकवडा विधुत वितरण कंपनी अंतर्गत पाटनबोरी हया गावांत विधुत वितरण व्यवस्थेचा पुरता धुडगूस सुरू आहे त्यामुळे तेथील ग्राहक प्रहारचे जयवंत बावणे,विनोद कनाके,विजय अग्रवाल ह्या कार्यकर्त्या कडे पाटनबोरी वासियाच्या विधुत वितरण कंपनी बाबत असंख्य तक्रारी आल्या त्यांनी त्या तक्रारी ग्राहक प्रहारचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर कडे केल्या असता आज ग्राहक प्रहारचे शिष्टमंडळ मंगेश वैद्य ह्यांना भेटून सविस्तर चर्चा करण्यात आली तेव्हा ते म्हणाले ,लवकरच पाटनबोरी येथे तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करून करू,माझे सहकारी सह्य अभियंता राठोड ह्यांचेशी चर्चा करून तारीख निश्चित करू ह्यात ग्राहकांच्या तक्रारी तिथल्या तिथे सोडवू !नवीन डीपी सुद्धा बसवू असे त्यांनी सांगितले. पिंपरी शिवारातील शेतातील मोटारीचा विधुत पुरवठा आठ दिवसापासून बंद असल्यामुळे तेथील शेतकरी बांधवांचे शेतातील उभे पीक केळी, पपई आणि ईतर पीक वाळण्यास सुरवात झाली होती .ह्याबाबत ग्राहक प्रहारचे नावलेकर हयानी वैदय साहेबांशी संपर्क करून समस्या सांगितली असता त्यांनी हया बाबत ताबडतोब चौकशी केली असता सत्य बाहेर आले तेथील डीपी चे प्लेट्स चोरट्याने चोरून नेल्याने ही समस्या निर्माण झाली ,त्यानी ह्या बाबत पर्यायी व्यवस्था ऐक तासात करून विधुत पुरवठा सुरू केला त्या मुळे ह्या भागातील कास्तकारांनी समाधान व्यक्त केले .त्यामुळे ग्राहक प्रहारचे शिष्टमंडळाने मंगेश वैदय कार्यकारी अभियंता ह्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले ग्राहक प्रहार चेशिष्टमंडळात डॉ राजेंद्र आत्राम ,दामोधर बाजोरीया,प्रसाद नावलेकर भैय्यासाहेब ठमके, यशवंत काळे,पराग जोशी,अमित एलकुंचवार आदी होते

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.