WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राजूर येथे वीर बिरसा यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

Image

जल-जंगल-जमीनीच्या संघर्ष हा मानवी हक्काचा लढा” …………...सरोज मून

वणी : वीर बिरसा मुंडा यांचा संघर्ष हा जल,जंगल व जमीन ह्या मूलभूत गोष्टींसाठी होता. नैसर्गिक साधन संपत्तीवर मूठभरांचा नाही तर समस्त जनतेचा अधिकार असला पाहिजे ह्या प्रमुख पायावर बिरसांच्या संघर्ष होता व आहे. कारण आजही जगामध्ये मूठभर लोक ह्यावर ताबा करून बसले आहेत आणि म्हणून हा संघर्ष मानवी हक्काचा संघर्ष आहे”, असे प्रतिपादन येथील उच्चविद्याविभूषित पोलीस पाटील सरोज मून यांनी वीर बिरसा यांच्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या अभिवादन प्रसंगी केले.

शहीद वीर बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त राजूर कॉलरी येथे वीर बिरसा मुंडा नगरात त्यांना अभिवादन करण्यात आले. या अभिवादन कार्यक्रमाला राष्ट्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महेश लिपटे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी, AISF चे माजी जिल्हा अध्यक्ष कॉ. नंदकिशोर लोहकरे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून हजर राहून ह्यांनी विचार मांडले. सर्वप्रथम पो पा सरोज मून यांचे हस्ते वीर बिरसा यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने वैभव मजगवळी, सतीश मांदाडे, विष्णू कदम, सुरेश किनाके, प्रकाश पेंदोर, शंकर मेश्राम, अमर्त्य मोहरमपुरी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.