WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

यवतमाळ जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के.....

Image

सुरज चाटे वणी :- नांदेड जिल्हयातील माहूर व किनवट तालूक्यातील अनेक गावात व यवतमाळ जिल्हातील महागाव , आर्णी व घाटंजी तालूक्यातील अनेक गावात भुंकपाचे सौम्य धक्के बसले. घाटंजी तालुक्यातील सीमावर्ती भागातील सावली खडका चिखलावर्ध कुर्ली झटाळा भागात भूकंपाचे धक्के बसले असून यवतमाळ जिल्ह्यातील मराठवाडाच्या सीमावर्ती भागात शुक्रवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास तीन ते पाच सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे.

आर्णी तालुक्याच्या सावळी सदोबा येथील,सावळीपासून एक किलोमीटर अंतरावरील चिचबर्डी-बारभाई, सावळी सदोबा, इचोरा, माळेगाव, पुरुषोत्तमनगर, वरुड (तुका), उमरी आदी गावात भूकंपाचे धक्के जाणवले. टीव्ही पाहणाºया, बाहेर झोपलेल्या नागरिकांनी हे धक्के अनुभवले. टीव्हीवरील फ्लॉवर प्लॉट पडणे, घरातील भांडे पडणे, बंद पंखे हालणे, घर हलणे आदी बाबी नागरिकांना जाणवल्या. चिचबर्डी परिसर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आहे. याच भागातील अंजनखेड, राणीधानोरा, गोंडवडसा, साकूर, कवठा बाजार, कोसदनी, अंबोडा येथेसुद्धा भूकंपाचे धक्के जाणवल्याने गावातील नागरिकांनी भीतीने रस्त्यावर धाव घेतली.

पैनगंगा नदीच्या अलिकडील भागात हे धक्के जाणवले आहे. उमरखेड तालुक्यातील ढाणकी, बिटरगाव, विडूळ, मन्याळी, वडद, मुडाणा, बेलखेड या गावांनाही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. जिल्ह्याच्या मराठवाडा सीमेवरील बहुतांश तालुक्यातील गावांमध्ये हे धक्के जाणवले आहे. महागाव तालुक्यातील करंजखेड, कासारबेहळसह सहा गावांमध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले. जाणवले

होय धक्के जाणवले - जिल्हाधिकारी.....

दरम्यान जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले की, उमरखेड तालुक्यातील ढाणकी व परिसरातील गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती नुकतीच मिळाली. या माहितीची प्रशासनाकडून खातरजमा केली जात आहे. जिल्ह्याच्या अन्य भागातही कुठे अशाच पद्धतीने भूकंपाचे धक्के जाणवले का याची माहिती घेतली जात आहे. मात्र हे धक्के अगदीच सौम्य स्वरूपाचे असल्याचे जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी सांगितले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.