WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आमदार बच्चूभाऊ कडू ह्यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा !

Image

आज दिनांक 5 जुलै रोजी आमदार बच्चूभाऊ कडू ह्यांचा वाढदिवस ,प्रहार जनशक्ती पक्षाने आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला.जिल्हा अध्यक्ष विलासभाऊ पवार ह्याना प्रसाद नावलेकर ह्यानी सुचविले तेलंग टाकळी पारधी बेड्यावरील अनाथ स्त्री रेणुका ओमदेव राठोड हीचे घर वाराधुंद व पावसाने उडाले तहसीलदार सुरेश कव्हले ह्यांनी लोकसहभागातून तीचे घर उभे केले व लवकरच घरकुल बांधून देणार ,ग्राहक प्रहरच्या माध्यमातून अशोक बजाज ह्यांनी प्लास्टिक दिले आपण काही सहकार्य करावे त्यांनी निर्णय घेतला आमदार बच्चूभाऊ कडू ह्यांच्या वाढदिवसाला कोणतेही पोस्टर बॅनर न लावता तो पैसा त्या अनाथ महिलेच्या घरी किराणा द्यायचा ,आणि आज विलासभाऊ पवार जिल्हा अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष ह्याच्या पुढाकाराने महिन्या भराचा किराणा देण्यात आला .ह्या प्रसंगी मोहन मेंनेवार,प्रकाश कायपेलीवार, दत्ता पवार, अखिल कोठारे,सौरभ सिद्धेवार, अनुप खांडरे, निलेश वाभीटकर,नीरज गुरनुले,हनुमान नेहारे तसेच मनोज चवरे पटवारीतसेच ग्राहक प्रहार संघटनेचे यशवंत काळे ,दामोधर बाजोरीया,भैय्या साहेब ठमके आदी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले