WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वृक्ष माणसाचे मित्र आहे.....झाडे लावा , झाडे जगवा काळाची गरज.....रवी बेलूरकर

ImageImage

आजच 'झाडे लावा, झाडे जगवा ' ही काळाची अत्यंत महत्वाची गरज आहे याकरिता शासन प्रयत्न करत असून चालणार नाही. ज्या प्रमाणे सामाजिक संघटना कार्य उत्तम करत आहे तसेच कार्य प्रत्येक नागरिकाने झाड लावण्याचे कर्तव्य समजून प्रभू श्रीराम नवमी उत्सव समिती तर्फे वरझडी देवस्थान परिसरात वृक्ष लावण्याचे कार्य भाजप चे शहर अध्यक्ष , श्रीराम नवमी जन्मोत्सव समिती अध्यक्ष रवी बेलूरकर यांनी हाती घेतले आहे. या देवस्थान परिसरात झाडे लावून त्याचे संगोपन करून निसर्ग रक्षणासाठी प्रयत्न करण्याचा त्यांचा मानस आहे. या कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी गावातील नागरिकांना झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. यावेळी कौशिक खेरा, पंकज कासावर,विजय मेश्राम,नितेश मदीकुंटावार,पवन खंडाळकर; प्रसन्ना संदलवार,अभिजीत राऊत,सुरज निकुरे,सचिन तावाडे,संतोष ठेंगणे,तथा अन्य सदस्य गण व गावातील नागरिक यांनी वृक्षारोपण केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले