WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विद्यार्थ्यांचे पोलीस काका होणार मित्र.....

Image

शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळणार पोलीस काका व पोलीस दीदी....

सागर मुने, वणी :- बालकांवरील होणारे अत्याचार, शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांन वर घडणारे अनुचित प्रकार थांबवण्यासाठी वणी पोलिसांचा उपक्रम सुरू होत आहे. या करिता पोलिसानी शाळकरी मुलांन करिता पोलिस काका व पोलीस दीदी असा चांगला उपक्रम आणला असून आता पोलीस विद्यार्थ्यांचे मित्र होतील.

शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून त्यांच्यावर होत असलेला अन्याय कोणाला सांगावे हा प्रश्न निर्माण होतो तसेच ते कोणालाही सांगत नाही. त्यामुळे नैराश्य निर्माण होऊन आत्महत्या किंवा गुन्हेगारी कडे वळतात. या घटनेवर आळा घालण्यासाठी त्यांना नवी दिशा देण्यासाठी पोलीस विभाग करणार आहे.

वणीचे पोलीस निरीक्षक वैभव जाधव शाळा, महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना त्यांच्यावर होणारे अन्याय सहन न करता त्यांनी तक्रार पेटीत झालेली घटना लिहून पेटीत टाकणे किंवा त्या पेटीवर पोलिसांचे फोन नंबर वर पोलीस काका,दीदी याना फोन द्वारे माहिती सांगणे. त्यांच्यावरील होणारे अत्याचार नक्कीच कमी होईल अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली.

हा उपक्रम जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैभव जाधव राबविणार आहे.

ते बोलताना म्हणाले वणी शहरातील शाळा महाविद्यालयात व बाहेर मुलींना त्रास देणाऱ्या मुलांन वर कारवाई करणार आहे. त्यामुळे शहरातील मजणूची आता खैर नाही.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.