WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रोड रोमियोचा बंदोबस्त करा- रवी बेलूरकर......

Image

शहरातील विद्यालय, महाविद्यालय व खाजगी शिकवणी वर्गाच्या परिसरात दिवसेंदिवस मुलींना त्रास देणाऱ्या रोड रोमियोची संख्या वाढत आहे. या रोमियोंना आळा घालण्याकरिता गुरुवारी दि.18 जुलैला रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर व कार्यकर्त्यांनी ठाणेदार वैभव जाधव यांना निवेदन देऊन या मुलींची छेड काढणाऱ्या रोमियोंचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

शहरातील एस.पी.एम. विद्यालय, लोकमान्य टिळक महाविद्यालय, प्रगती नगर, एकता नगर परिसरात मुलींची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. विद्यालय, महाविद्यालयात व शिकवणी वर्गात येणाऱ्या मुलींची छेड काढण्याचा प्रताप त्या ठिकाणी चौकात उभे असलेल्या काही मुलांकडून काढल्या जाते. हा प्रकार आता दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकाराला वर्गाला येणाऱ्या विद्यार्थीनी कंटाळल्या आहेत. यामुळे एखादी मोठी अप्रिय घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वणी शहरात रस्त्याने धूम बाईक चालवणारे खूप वाढले असून शहरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. मागेच धूम बाईक स्वराने जीव घेतला आहे. तसेच शहरातील अनेक ठिकाणी जीवित हाणी होऊ शकते.

त्यामुळे अशा रोड रोमियोंचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी वणीचे ठाणेदार वैभव जाधव यांना रामनवमी अध्यक्ष रवी बेलूरकर यांनी निवेदनातून केली आहे. निवेदन देतांना पंकज कासावार, कौशिक खेरा, अविनाश आवारी, सुरज निकुरे, प्रसन्न संदलावार, रोशन मोहितकर इत्यादी युवक उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले