WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मतदार नोंदणी प्रारंभ..... वणीकरांनी योजनेचा लाभ घ्यावा.... मतदार नोंदणी अधिकारी यांचे आवाहन

Image

प्रणय मुने, वणी

15 ते 31 जुलै 2019 या कालावधीत नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू झाला आहे, 
तरी 1 जानेवारी 2019 या अहर्ता दिनांका नुसार 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या नवीन मतदारांनी 
वणीच्या मतदान केंद्रावर जाऊन केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क करावा व
 आपला मतदानाचा हक्क, अधिकार प्राप्त करून देशाची लोकशाही प्रबळ करावी

             नवीन मतदार नोंदणीसाठी कागदपत्रे
घरातील मुलगा/मुलगी यांच्या नाव नोंदणीसाठी कागदपत्रे
१)जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट
२)रहिवासी दाखला ग्रामसेवक किंवा तलाठी यांचे सहीचा
३)आधार कार्ड झेरॉक्स
४) १ पासपोर्ट साईज फोटो
५)घरातील नात्यातील(आई, वडील, भाऊ, बहीण)यांपैकी एकाचे ज्यांचे नाव अगोदर मतदार 
यादीत समाविष्ठ असेल तर त्यांच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स
घरातील सुनबाईचे नाव समाविष्ट करण्यासाठी कागदपत्रे
१)जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड सर्टिफिकेट
२)रहिवासी दाखला ग्रामसेवक/तलाठी यांचे सहीचा
३)१ पासपोर्ट साईज फोटो
४)माहेरच्या गावात मतदार यादीत नाव असेल तर ते नाव कमी केल्याचा दाखला.
५)माहेरच्या गावात मतदार यादीत नाव नसेल तर यादीत नाव नसल्याचा दाखला
६)पतीचे मतदार ओळखपत्र झेरॉक्स
७)असल्यास लग्नपत्रिका

वरीलप्रमाणे कागदपत्रे घेऊन नोंदणी करण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी वणी यांनी केले आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.