WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सोन्याचे दागिने साफ करुन देण्याची बतावनी करुन दोन महिलांना गंडविले....

Image

दिड लाखाचे दागिने घेऊन तिन भामटे पसार

सुरज चाटे वणी :- शहरातील शास्ञि नगर भागात मोटर सायकल वरुन तिन भामटे हजर होवुन आम्ही व्हिम कंपनिकडुन आल्याची बतावनी केली.व व्हिम कंपनिचे पितळ व तांब्याचे भांडे साफ करण्याचे एक लिक्विड दाखवुन भांडे साफ करण्याचे बतावणी करुन सोन्याचेही दागिने साफ करुन देण्याची बतावणी करुन दोन महिलांचे दागिने घेवुन भामटे पसार झाले.हि घटना दि.20 जुलै ला दु.1:30 वाजताचे दरम्यान उघडकिस आली. सिंधू रामदास रामटेके (42 ) व संगीता गणेश लोखंडे(25)या महिला घरी असताना 3 भामटे आले व व्हीम कंपनीकडून भांडे साफ करण्याचे लिक्विड आणले असून तुमच्या घरचे भांडे साफ करून दाखवतो या बहाण्याने त्या महिलांना तांबे पितळचे भांडे साफ करून दाखविले व नंतर सोने सुद्धा साफ करून देतो म्हणून त्या महिलांनी गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने साफ करण्यासाठी दिले त्या दोन्ही महिलांचे दागिने एका स्टीलच्या डब्यात हळदीचे पाणी व लिक्विड टाकून गॅसवर ठेवण्यास सांगितले.त्यानंतर दुसऱ्याचे सोने साफ करावयाचे आहे अशी थाप मारून ते तिन्ही भामटे पसार झाले. सदर महिलांनी डब्बा उघडून पाहिले असता त्यातील सोने गायब झाल्याचे आढळून आले. त्या महिलांनी आरडा ओरड करून त्या भामट्यांचा शोध घेतला असता ते पसार झाल्याचे लक्षात आले.या घटनेची माहिती वणी पोलिसांना मिळताच डी बी पथक घटना स्थळी दाखल झाले.पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.