WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

संस्कार भारती समितीच्या अध्यक्षपदी कविता चटकी तर उपाध्यक्षपदी पुजा गढवाल यांची निवड

Image

कलेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारी संस्कार भारती समितीच्या वणी शाखेच्या अध्यक्ष पदावर विविध सामाजिक कार्यकार्यत नेहमी योगदान देणाऱ्या, धनोजे कुणबी महिला आघाडीच्या सचिव यांची संस्कार भारती समितीच्या अध्यक्ष पदावर कविता चटकी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. संस्कार भारती समिती 2019 - 2020 करिता नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष पूजा गढवाल या सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आहे व स्वतःचा त्यांचा रेस्टॉरंट चा व्यवसाय आहे. संस्कृत मध्ये पारंगत असलेल्या स्वर्णलीला शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत रुपाली सालकाडे यांची कोष्याध्यक्ष पदावर निवड झाली आहे.

संस्कार भारती समिती वणी शाखेची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

मंत्री : सागर मुने,प्रसिद्धी प्रमुख : अमित उपाध्ये, सल्लागार : माधवराव सरपटवार, अशोक सोनटक्के, संध्या अवताडे रांगोळी प्रमुख : पौर्णिमा पांडे व लता पांडे, संगीत विधा : अभिलाष राजूरकर, अजित खंदारे, नृत्य विधा : विकास घाटोळे, आकाश बोथले, भारती लोहबडे साहित्य : रजनी पोयाम, सदस्य : प्रवीण सातपुते, निकिता बोबडे, साक्षी खुसपुरे, परितोष पानट, प्रणय मुने, यांची निवड झाली आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले