WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ट्रॅव्हल्स मोटारसायकल अपघात....तीन महीलांसह सात जखमी

Image

रोहन आदेवार मारेगाव :- ट्रॅव्हल्स व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात तीन महीलांसह सात जण किरकोळ जखमी झाल्याची घटना संध्याकाळी पाच वाजताचे दरम्यान वणी यवतमाळ राज्य महामार्गावरील ईस्सार पेट्रोल पंप जवळ घडली .

वणी वरुन यवतमाळ जाणारी ट्रॅव्हल्स क्र. एम एच २९ एम ८३३० अचानक पेट्रोल पंप वरुन येणाऱ्या मोटारसायकल क्र.एम एच २९ ए बी ५८७५ या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रव्हल्स चालकाचे गाडीवरील नियंत्रन सुटल्याने दोन वाहनात हा अपघात घडला.

यवतमाळ जाणारी ट्रँव्हल्स अपघात टाळत असताना ट्रॅव्हल्स चालकाचे ट्रॅव्हल वरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल श्रीकांत कोरले यांचे शेतात जावुन थांबली.या अपघातात ट्रॅव्हल मधिल लक्ष्मी अंबादेवे, रुपाली उईके , मुरलीधर लखमापुरे, गीता लखमापुरे ,सुधीर वणवे हे किरकोळ जखमी झाले आहेत. तर मोटारसायकल वरील पांडुरंग श्रीरामे,नानाजी बोकडे जखमी झाले आहेत.सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.