WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

गडचांदूर येथील मोफत नेत्रतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Image

३५६ रुग्णांचे मोफत उपचार : ग्रामीण रुग्णालयात नाष्टावाटप व नवजात बालकांना वस्त्रदान

गडचांदूर-रफिक शेख प्रतिनिधी -: आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पक्ष व गडचांदूर मित्रमंडळा तर्फे गडचांदूर येथे डॉ. जयदीप यादवराव चटप यांच्या क्लिनिकला भव्य मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू- काचबिंदू व चष्मे वाटप शिबीर पार पडले. महात्मे रुग्णपेठिका नागपूर, अंबुजा फाउंडेशन व आकाश व-हाटे यांचे विशेष सहकार्य लाभले. परिसरातील ३५६ रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरात यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी डॉक्टरी हा केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे माध्यम असल्याचे सांगितले.


प्रहार जनशक्ती पक्ष व गडचांदूर मित्रमंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून गडचांदूरचे ठाणेदार विलास चव्हाण, गडचांदूर ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी धर्मेंद्र सुलभेवार, डॉ. जयदीप यादवराव चटप, डॉ.प्रविण लोनगाडगे उपस्थित होते.
आमदार बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र विधानसभेत शेतकरी, कामगार, महिला, अपंग व अनाथ घटकांचे प्रश्न मांडण्यात अग्रेसर आहेत. राजकारणाला सामाजिक सेवेची जोड देऊन परिवर्तनाची लढाई ते लढत आहेत. आमदार वेतनवाढ विरोधात बोलणारे एकमेव आमदार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नि:स्वार्थ सेवेला सलाम म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
दरम्यान प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष सतीश बिटकर यांच्या पुढाकाराने गडचांदूर मित्रमंडळातर्फे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप व नवजात बालकांना वस्त्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश बिडकर, संचालन अॅड.दीपक चटप यांनी केले. तर आभार पंकज माणूसमारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.शैलेश विरुटकर, सागर गुडेल्लीवार, इंजी. अरविंद वाघमारे, विजय बानकर, अफरोज अली,जीवन टोगरे आदी मित्रमंडळींनी परिश्रम घेतले.
डोळ्यांचे वाढते आजार कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिबिरांचे आयोजन गरजेचे आहे. ग्रामीण भागात नागरिकांनी डोळ्यांच्या आजाराकडे दुर्लक्ष करता कामा नये. वेळोवेळी अशाप्रकारे लोकपयोगी शिबिर आयोजित होणे गरजेचे आहे.
- विलास चव्हाण (ठाणेदार, गडचांदूर)
======================
१०३ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून २३ व २५ जुलैला या रुग्णांना नागपूरला नेण्यात येईल व त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. रुग्णांचा प्रवास व इतर सोयीसुविधांचा खर्च प्रहार संघटना पुरवेल.
- श्री. सतीश बिडकर, (तालुकाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष)

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले