WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राजमिस्त्री कामगार संघाचा भारतीय कामगार स्थापना दिवस उत्साहात संपन्न...

Image

पिडित कामगारांना आर्थिक मदत गडचांदूर-रफिक शेख प्रतिनिधी :- राजमिस्त्री कामगार संघ गडचादूर येथे भारतीय मजदुर स्थापना दिवस उत्साहात पार पडला. यावेळी अध्यक्ष स्थानी इमारत व इतर बांधकाम कामगार संघाचे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याचे अध्यक्ष मनोहर साळवे तर प्रमुख पाहुणे म्हणून कोरपना तालुका सचिव संगीता चिंतलवार, पत्रकार नासिर खान, रफिक शेख, कयुम खान, चंद्रकांत सोमवंशी, किसन देवकर, सुनील गोंडे हजर होते. अटल विश्वकर्मा सन्मान योजने अंतर्गत विशेष नोंदणी अभियान सुद्धा चालविण्यात येत आहे. ज्यामध्ये जवळपास 110 ठेकेदारांचे 1100 कामगार या अभियाना द्वारे नोंदणी करण्यात येणार आहे. या वेळी लखमापूर येथील कामगार सुधाकर चंदनखेडे यांची पत्नी संगीता चंदनखेडे यांना अकरा हजार रुपयांची मदत व कामगार संजय झाडे यांना पाच हजार रुपयांची मदत राजमिस्त्री कामगार संघ गडचांदूर यांच्या तर्फे देण्यात आले. या वेळी जिलाअध्यक्ष मनोहर साळवे, पत्रकार नासिर खान, रफिक शेख पत्रकार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कामगारांनी संघाठीत राहून संघटना वाढवावी कोणत्याही अफवेला बळी न पडता सारे संघटीत राहून विविध योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हा अध्यक्ष साळवे यांनी केले. संचालन व आभार अरविंद कोवे, प्रास्ताविक सुनील गोंडे यांनी केले. यावेळी कामगार मोठ्या संख्येत उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले