WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लखमापूर येथील विठ्ठल रुक्मिणी परिसरात वृक्षारोपण

Image

सामाजिक कार्यकर्ते डॉ मेश्राम यांचे कडून १०० वृक्ष भेट
गडचांदूर-रफिक शेख प्रतिनिधी :- कोरपना तालुक्यातील लखमापूर येथील विठ्ठल रुक्मिणी परिसरात सामाजिक कार्यकर्ते डॉ सचिन मेश्राम व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच मोरेश्वर आस्वले एकनाथ वडस्कर जी.घोरपडे सर दादाजी आस्वले, यशवंत चवले वासुदेव बोधे संदीप बावणे हरिदास पारखी आदी उपस्थित होते. दिवसेंदिवस दुष्काळाची वाढती तीव्रता,पाणी टंचाईची स्थिती तसेच पावसाचे अनियमित आगमन यामुळे पर्यावरण संतुलन बिघडू लागले आहे. शिवाय परिपूर्ण वाढलेली झाडे चारजणांच्या कुटुंबासाठी पुरेसा ठरेल, एवढा ऑक्सिजन निर्माण करतात. वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटू लागल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ सचिन मेश्राम यांनी लखमापूर गावाला कडुलिंबाची १०० वृक्ष भेट दिली व ती झाडें जगविण्याचा संकल्प केला आहे त्यांनी अगोदर सुध्दा अनेक गावाला विकासाच्या दृष्टिकोनातून मद्दत केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले