WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नारंडा येथे वनतालावाची निर्मिती

Image

भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या प्रयत्नांना यश
★★★★★★★★★★★★★★★★★★
गडचांदूर-रफिक शेख प्रतिनिधी :- कोरपना तालुक्यातील नारंडा येथे वनतालावाची निर्मिती झाली असून याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी आमदार अँड.संजय धोटे यांच्या माध्यमातून उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे व तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी ठेमस्कर यांचेकडे पाठपुरवठा करून सदर मागणी मंजुर केली होती.
नारंडा या गावाचा सन २०१८-१९ मध्ये जलयुक्त शिवार अभियान योजनेत समावेश झाला होता,नारंडा येथे दोन तलाव असून त्यापैकी एका तलावाचे खोलीकरण झाले आहे.नारंडा येथे वनविभागाची जवळपास २५० हेक्टर जागा असून त्यापैकी काही जागेवर वनतालाव निर्मिती करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. नारंडा येथे बहुतांश भाग हा पठारी असून पावसाळ्यात सदर पाणी हे पिपरी रस्त्याने शेतकऱ्यांच्या शिवारात जात असे त्यामुळे त्यांचे नुकसान होत असे जर सदर भागात वनतालाव निर्माण झाल्यास पठारी भागातील पावसाळ्यात पाणी हे वनतलावात साठणार होते व शेतातील होणारे नुकसान टळणार होते सदर बाब लक्षात घेऊन भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी वनतलावाच्या निर्मिती साठी प्रयत्न केले,त्यानंतर सदर वनतालावाची प्रशासकीय मंजुरी झाली व वनतालावाची निर्मिती करण्यात आली.
त्यानंतरच्या पावसात वनतलावात पाणी साचले असून शेतशिवारातील व गावातील पाण्याची पातळी वाढण्याच्या दृष्टीने मदत होणार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले