WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अपघातात पती ठार, तर पत्नीसह तीन जण जखमी

Image

वणी :- चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात पती ठार, तर पत्नीसह तीन जण जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजता राळेगाव रोडवरील आमला गावाजवळ घडली. एम.एच.-२९-ए.आर.-३९६१ या क्रमांकाची कार वणी येथून राळेगाव मार्गे कळंबकडे येत होती. आमला गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली. या घटनेत अशोक वासेकर (५५) रा.वणी, कल्पना अशोक वासेकर (५०) यांच्यासह चार जणांचा समावेश होता. त्यांना तत्काळ कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने जखमींना यवतमाळ येथे हलविले. यात अशोक वासेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कल्पना वासेकर यांच्यासह तिघांवर उपचार केले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले