WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सहकार्य करा पोलीस प्रशासन तुमच्या सोबत आहे....... उपविभागीय पोलीस अधिकारी नायक....

Image

वणीत शांतता कमेटीची बैठक संपन्न..... राजू गव्हाणे वणी - वणी पोलिस स्टेशन व शांतता कमिटी यांचे संयुक्त विद्यमाने वणी पोलीस स्टेशन ला दिनांक 27 ला सायंकाळी 6 वाजता शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती या सभेला अध्यक्ष वणी विधानसभेचे लिकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, तहसिलदार धानमाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, वणीचे कर्तव्य दक्ष ठाणेदार वैभव जाधव, विजयमाला रिठे आदी उपस्थित होते या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आपण कशाप्रकारे शांतप्रिय सुव्यवस्थित पणे सर्व सण उत्सव पार पाडू या दृष्टीने उपयुक्त अशा उदाहरणांसह योग्य मार्गदर्शन केले, त्यांनी सांगितले की जनतेनी सहकार्य करावे पोलीस प्रशासन तुमच्या सोबत आहे. तसेच वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोडकूरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे आदींनी उपयुक्त अशी माहिती देत आपल्याला कशाप्रकारे शांतताप्रिय मार्गाने समोर जायचे आहे सर्व धर्म समभाव हा एकमेव हेतू ठेऊन सर्व बाबींचा विचार करून योग्य रित्या प्रत्येक उत्सव पार पडण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले, या प्रसंगी प्रस्ताविकपर विचार व्यक्तकरताना ठाणेदार जाधव म्हणाले की, वणी शहरातील शांतता टिकवून ठेवण्यासाठी कटिबद्ध राऊन कर्तव्यनिष्ठेने व जबाबदारीने संपूर्ण वणी शहरातील शांतता टिकवून ठेवण्यासाठी मी कटिबद्ध राहील असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे तसेच शांतता कमिटीचे सदस्य राजाभाऊ पाथरडकर, मंगल तेलंग, रजाक पठाण शालिनीताई रासेकर, रवी बेलूरकर, नारायण गोडे, यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी गणपतीची परवानगी ऑन लाईन मिळेल मूर्ती ची स्थपणा रोडवर करू नये दहा दिवस मूर्तीची काळजी घ्यावी देखावे करत असताना कायदेशीर इलेक्ट्रिक सप्लाय घ्या कायद्याचा भंग होणार नाही, तसेच विसर्जना संदर्भात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊं देऊं नये गणेश उत्सव दुर्गा उसत्व मोहरम यासारखे उत्सव सर्वधर्म समभावाने साजरे करण्यात यावे जेणेकरून शांतताप्रिय वणीची शांतता भंग होऊ नये येथील नागरिकांनी काळजी घ्यावी असे सुद्धा सभेत सांगितले यावेळी सभेचे संचालन रवी साल्फेकर यांनी केले तर आभार वैभव जाधव साहेब यांनी मानले यशस्वीतेसाठी पोलीस विभाग व शांतता कमिटी ने परिश्रम घेतले यावेळी वणीतील पत्रकार व उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......