WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महाराष्ट्रातही कॉमन सर्व्हिस सेन्टर मधून नागरिकांना मिळणार कायदेशीर सल्ला।

Image

केंद्र शासनाच्या विधी व न्याय विभागाचा उपक्रम

राज्यात सर्वप्रथम चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे उदघाटन

गडचांदूर-रफिक शेख प्रतिनिधी :- केंद्र शासनाच्या विशेष उपक्रमांतर्गत इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही कॉमन सर्व्हिस सेन्टर मधून नागरिकांना कायदेशीर सल्ला मिळणार आहे।

केंद्र शासनाच्या विधी व न्याय विभागाचा हा नवीन उपक्रम राज्यात सर्वप्रथम चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे काल दिनांक 2 ऑगस्ट रोजी करण्यात आला। माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या शुभहस्ते टेली ला चे उदघाटन करण्यात आले।या प्रसंगी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय धोटे,जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते, भाजप चे राजुरा विधानसभा क्षेत्र प्रमुख खुशाल बोडे, जिवती तालुका अध्यक्ष केशव गिरमाजी, कोरपना तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर,माजी सरपंच शेख रउफभाई, राजू घरोटे,सतीश धोटे , पांडुरंग महाराज पुरी, कॉमन सर्व्हिस सोसायटी चे जिल्हा अध्यक्ष विनोद खंडाळे, जिल्हा सचिव उद्धव पुरी आदी प्रमुख मान्यवर मंचावर उपस्थित होते।

या प्रसंगीं परिसरातील गुणवत्त विद्यार्त्यांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला। आपले सरकार सेवा केंद्रामार्फत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेची अंमलबजावणी केली जात असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले। आमदार संजय धोटे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत ते देशाचे खरे आधारस्तंभ असल्याचे मत व्यक्त केले।

>उद्धव पुरी यांनी सिएससी केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती दिली।पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील डिजिटल इंडिया साकारण्याकरिता युवा पिढीने पुढाकार घेऊन नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे असे सांगितले। महाराष्ट्र राज्यातील आपले सरकार सेवा केंद्रातून राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या सेवा पुरविल्या जात असून टेली मेडिसिन, आयुष्यमान भारत, असंघटित कामगारांना पेन्शन मानधन योजना , राष्ट्रीय पेन्शन योजना, महसूल सेवा,परिवहन विभागाच्या सेवा इत्यादी सह विधी सेवा सुद्धा सुरुवात करण्यात आली आहे। त्या मुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना सुद्धा आपल्या गावातच तज्ञ वकीलांचे मार्गदर्शन व कोर्ट केस संबंधी सर्व माहिती, निकाल, मिळण्याची सोय होणार आहे। चंद्रपूर जिल्ह्याचे पाठोपाठ संपुर्ण महाराष्ट्र राज्यात ही सेवा लवकरच सुरू केली जाणार असल्याचे प्रतिपादन हंसराज अहिर यांनी केले।

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शहर प्रमुख सतीश उपलेंचवार यांनी केले। या वेळी परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते।

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.