WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन समाजाचे ऋण फेडावे...डॉ सचिन मेश्राम

Image

कुकुडसाथ येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

गडचांदूर: विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेवून समाजाचे ऋण फेडावे असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ सचिन मेश्राम यांनी व्यक्त केले ते शेतकरी भवन कुकुडसाथ येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदना चवले सरपंचा प्रमुख मागदर्शक सोपान नागरगोजे कार्यक्रम व्यवस्थापक अंबुजा प्रमुख अतिथी प्रमोद खडसे जितेंद्र बैस सिद्देश्वर जम्पलवार उपसरपंच गजानन आस्वले प्रभाकर लखमापुरे जितेंद्र मुठ्ठलकर पो पाटील वासुदेव बोधे शंकर आत्राम मीना आत्राम कविता लखमापूरे आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी जिद्द परिश्रम चिकाटीच्या जोरावर अनेक यशाची शिखरे गाठता येतात असे सांगून पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सोपान नागरगोजे म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये कष्टाची तयारी असल्यास व योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थी जीवनात नक्कीच यशस्वी होऊ शकतो असे मत व्यक्त केले. यावेळी उत्तीर्ण झालेल्या १० ,१२ वी विदयार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा गरजे तर आभार सचिव सूर्यवंशी यांनी मानले यावेळी गावातील विद्यार्थी पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR