WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चक्क पोलीस चौकीच्या बाजूनेच चोरांनी साधला डाव.....

Image

बंद पोलीस चौकीचा घेतला फायदा :- बंद चौकी सुरू करण्याची जनतेची मागणी.....

रंगनाथ स्वामी परिसरात चोरीचा सपाटा सुरूच....

चक्क धंद्यांच्या साहित्यावरच चोरांचा डल्ला.....

चोरांनी चक्क आता धंद्यांच्या सहित्यावरच हाथ सफा करण्याकडे लक्ष ओढले असून आता त्यांचा जवळच्या दिसेल त्या वस्तूवर आपला डल्ला मारीत उदरनिर्वाह करण्याचा सपाटा त्यांनी सुरू केला असून रंगनाथ स्वामी मंदिर परिसरात बंद स्थितीत असलेली पोलीस चौकी मात्र या चोरांना वाकोल्या दाखवीत असून ती चौकी सतत सुरू राहल्यास येथील चोरी, लूटमार आदी प्रकारच्या समस्यांना आळा बसू शकते असे असतानाही याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.

परिसरातील अशोक गोसाई शिरपुरक राहनार नविन वाघदरा रंगनाथ स्वामी मदिर परीसर पोलीस चाैकी च्या साईडला प्रेस चे दुकानत असून दि, १,८,२०१९ रोज गुरूवार ला त्यांचा उदरनिर्वाह ज्यावर चालतो परिसरातील लोकांचे कपडे प्रेस करून परिवाराचा गाळा चालवीत होते अशा गोर गरिबाची चक्क पितळी प्रेसच चोरांनी लंपास केली असून आता चोरांचा डोळा चक्क गोर गरीब जनतेच्या उदरनिर्वाहाचा साधनांवर दिसून येत आहे तर दुसरीकडे धर्मेन्द्र काकडे याच्या ट्रॅकटर ची बॅटरी चोरीला गेली ते रात्री च्या वेळीची घटना असून संबंधित ट्रॅक्टर हे चक्क पोलीस चौकीच्या बाजूला असून सुद्धा पोलीस चौकीच्या कडेला असलेली वस्तू सुद्धा आता सुरक्षित नसल्याने चोरांनी पोलिसांना आवाहन देण्याचे जणू धाडसच दाखवले आहे यामुळे तातडीने ही चौकी सुरू व्हावी असे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.

ठाणेदार साहेब याकडे लक्ष देणार काय?....

कर्तव्य दक्ष ठाणेदार म्हणून वणी पोलीस स्टेशनचे निरीक्षक वैभव जाधव यांचे कार्य अतिशय योग्य पद्धतीने वणीसह क्षेत्रात दिसून येत असून बंद स्थितीत असलेली पोलीस चौकी लवकरात लवकर सुरू व्हावी असा सुरू नागरिकांचा असून याकडे ठाणेदार साहेब लक्ष देतील का? असा प्रश्न येथील नागरिकांत असून जर ही चौकी सुरू झाल्यास येथील परिसरातील घटनाना बऱ्याच प्रमाणात आळा बसणार असून तातडीने संबंधित विभागाने पोलीस चौकी सुरुकरावी अशी मागणी परिसरात जोर धरत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.