WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

संस्कृत महोत्सवात रंगली संस्कृत नृत्य स्पर्धा ......

Image

संस्कृतचा प्रचार आणि प्रसार कार्याकरिता विविध उपक्रमांच्या द्वारे कटिबद्ध असणाऱ्या संस्कृत भारती वणी शाखा,जैताई देवस्थान आणि लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या वतीने यावर्षी संस्कृत सप्ताहांतर्गत प्रथमच आयोजित करण्यात आलेला आगळावेगळा उपक्रम म्हणजे संस्कृत नृत्य स्पर्धा.

दिवसभर कोसळणारा पाऊस आणि विजेचा लपंडाव याची पर्वा न करता आलेले स्पर्धक

ख-या कौतुकाचा विषय होते.

कु. अदिती अभिजित अणे हीने 'ऐ गिरी नंदिनी ' या गीतावर पहिले नृत्य सादर करीत अप्रतिम वातावरण निर्मिती केली.

कु. जिया रितेश कटारिया हिने श्री गणेशस्तोत्रावर लक्षवेधक नृत्य सादर केले.

कु.अवनी योगेश शुक्ल आणि कु. रिद्धी अमोल बोरकर या दोघींच्या सादरीकरणाला देखील उपस्थित श्रोत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

सर्वाधिक आकर्षण ठरले ते श्रीगुरुवंदने वरील सामूहिक सादरीकरण. अदिती ,जिया,अवनी यांच्यासह कु. देविका जयप्रकाश वर्मा या चौघींनी सादर केलेल्या नृत्यास प्रेक्षकांनी उस्फूर्तप्रतिसाददेत

' पुनरेकवारम् ' ची मागणी केली.

कार्यक्रमाचा आरंभ रमेशजी अणे तथा विनय सरपटवार यांच्या हस्ते भारतमाता आणि नटराज पूजनाने झाला.या बालनृत्यांगणांची तयारी करून घेण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी रूपाली सालकडे हिने सुंदर सांभाळली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता भाकरे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश पुंड, आनंद बनसोड, कोमल बोबडे, गायत्री महालक्ष्मे यांच्यासह पालक वर्गाने परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share

Loading...