WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आदर्श प्रशासकीय महाविद्यालयात स्वतंत्र दिवस साजरा,,

Image

वणी

भारत देशात सर्वत्र स्वतंत्र दिवस हा राष्ट्रीय उत्सव म्हणून मोठ्या हर्ष उल्हासाने साजरा केला जातो या वर्षाला ७३ वा स्वतंत्र दिवस आदर्श प्रशासकीय महाविद्यालयात सकाळी ध्वजारोहण व विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आले

कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक रविंद्र गौरकर प्रमुख पाहुणे प्राचार्य निशांत खोब्रागडे, हरिभाऊ आसुटकर, महेश पुंड,बन्सोड सर, नारायण नालमवार, उज्वला गौरकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते

भारत देशात व्यापार करण्याकरिता म्हणून आलेले इंग्रज पुढे चालून राज्यकर्ते झाले व देशात गुलामगिरी निर्माण केली त्यानंतर भारतीय देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती देत सम्पूर्ण देशात आपल्या रक्ताच्या रांगोळ्या काढत भारत मातेला या गुलामगिरीतुन मुक्त केले आणि तो दिवस १५ ऑगस्ट१९४७ होता तेव्हा पासून स्वतंत्र दिवस म्हणून सम्पूर्ण भारतात राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो आणि यावर्षाला ७३ वा स्वतंत्र दिवस आपण साजरा करीत आहो असे मत मान्यवरणी व्यक्त केलं तसेच विद्यार्थी भाषणे व देशभक्तीपर गीते साजरी करण्यात आली

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा,पुरुषोत्तम नवघरे,प्रास्ताविक प्राचार्य निशांत खोब्रागडे व आभार प्रा, नितीन रामगिरवार यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा, वसंत चौधरी, प्रा, प्राजक्त चेलपेलवार,प्रा, राकेश वऱ्हाटे, प्रा,शुमाज शेख,प्रा,अक्षय मोहितकर,प्रा,रंजना भंडारवार, व निखिल गेडाम,आदींनी सहकार्य केले कार्यक्रमात मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.