WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रंजल्या गांजल्याची सेवा हेच माझे कर्तव्य- सुनील कातकडे

Image

शिवसेना रूग्णसेवेच्या वतीने मुकूडबन-मारेगाव येथे आरोग्य शिबीर संपन्न…

वणी- शेतकरी सुविधा केंद्र व शिवसेना रूग्णसेवा केंद्र यांच्या वतीने निशुल्क आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. केमिस्ट एन्ड ड्रगीस्ट असोसीएशन मारेगाव यांच्या वतीने मोफत औषधी वाटप करण्याचा उपक्रम राबविला.

समाजसेवेचा वसा अंगीकारणारे व इंदिरा सुतगिरणीचे अध्यक्ष सुनिल कातकडे यांच्या संकल्पनेतून मारेगाव येथे आरोग्य शिबीर राबविण्यात आले.

यामध्ये रक्तदान, मधुमेह, हृदयगती (ईसीजी) बॉडी मास इडेंक्स या सर्व आजाराचे करून मोफत औषधी वाटप करण्यात आले.

नागपूर येथील सुप्रसिध्द सेंटरपॉईट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथील तज्ञ डॉक्टरांच्या टिमने सहकार्य केले. सदर शिबीराप्रसंगी अध्यक्षस्थानी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनेते गजानन किन्हेकार, प्रमुख पाहुणे दिपक कोकास, वणी तालुका प्रमुख गणपत लेडांगे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शिबीर सपंन्न झाले.

दैनंदिन जीवन जगत असताना वातावरणातील बदल आणि आहारशैली शरीराला बाधक ठरत असून व्यसने या बाबींनी मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

रक्तदाब, मधुमेह, हृदयगती अशा आजाराची बाधा दिवसागणिक वाढत आहे. या आजारातून लकवा, हृदयविकार, मेंदूव्कार अशा जीवघेण्या आजाराचा धोका संभवतो. सदर बाब लक्षात घेता रूग्णसेवेच्या संधीचे मला भाग्य लाभले, असे या शिबीराप्रसंगी मोलाच मार्गदर्शन सुनिल कातकडे यांनी केले.

आरोग्य शिबीराप्रसंगी शेकडो रूग्णांनी तपासणी करून या औषधीचा लाभ घेतला.

सचिन पचारे, विशाल किन्हेकार, सुरेश नेहारे, बाळू चिडे, भास्कर वेले, राजु गौरकार, जीवन वैद्य, सुरज गमे, बंडु देऊळकर यासह समस्त शिवसैनिकांनी परिश्रम घेतले. केमिस्ट एन्ड ड्रगीस्ट असोसिएशन मारेगावचे अध्यक्ष दुष्यंत जयस्वाल व संचालक यांनी मोफत औषधी वाटप केले. तसेच शिवसेना रुग्णसेवा केंद्र वणी- मारेगाव- झरी यांचे विशेष सहकार्य लाभले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......