WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ओम नगर येथे तान्हा पोळा साजरा

Image

वणी चिखलगाव येथे ओम नगर महादेव मंदिराचे परिसरात तान्हा पोळा उत्सव घेण्यात आला यामध्ये वेशभूषा व नंदी बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दोन्ही स्पर्धेमध्ये कुमारी जीविका चौधरी हिने प्रथम क्रमांक आणि कुमारी रोहिणी नांदे हिने द्वितीय तर तृतीय क्रमांक मयूर बांदूरकर व वैष्णवी निमकर हीने द्वितीय क्रमांक पटकविला. खुश मित्तल आणि कु. ज्ञानदा दातारकर यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनेश श्रीवास्तव व प्रमुख पाहुणे श्री नसीम शेख हे होते. परिक्षण प्राचार्य बाळासाहेब राजूरकर व प्राचार्य विजयराव बोबडे यानी केले. कार्यक्रमाचे संचालन अशोक चौधरी व आभार प्रदर्शन नामदेवराव निखाडे यांनी केले कार्यक्रमासाठी समस्त ओमनगर वासीयांनी सहकार्य केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले