WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

दलाल, योजना आणि लूट; किती दिवस लुबाडणार

Image

झरी- आणखी किती दिवस अज्ञान लोकांचा फायदा घ्यायचा, कधी थांबणार ही दलालांची योजनेच्या नावाखाली होणारी लूट. झरी तालुका हा आदिवासी बहुल व मागासलेला तालुका म्हणून ओळखला जातो. इथे काही पुरुष व चतुर महिला शासकीय विविध योजनेच्या नावाखाली येथील जनतेची लूटपाट करीत आहे. "आम्ही हे देऊ" 'आम्ही ते देऊ' असे सांगतात. देत काहीच नाहीत. फक्त योजनेच्या नावाखाली लुबाडणूक करतात अशी परिसरात चर्चा आहे. मुद्रा लोन, घरकुल, गॅस, निराधार, विहिरी व राशनकार्ड आणि इतरही योजनेच्या भूलथापा देतात. हे दलाल येथील मागासलेल्या लोकांना वेगवेगळ्या योजनाचे आमिष देऊन अमाप पैसे घेतात या आमीषाला अशिक्षित शेतमजूर शेतकरी व बेरोजगार याला बळी ठरत आहे. याकडे संबधित प्रशासनाने जातीने लक्ष्य देऊन ही दलालांची फसवी स्कीम थांबवावी.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR