WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

यवतमाळ येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या बसस्थानका च्या वर लॉजिंगची व्यवस्था करण्यात यावी

Image

ग्राहक प्रहार संघटना जिल्हा यवतमाळ . यवतमाळचे बसस्थानक नव्याने बांधण्यात येणार असून अत्यंत आधुनिक असेल असे वर्तविल्या जात आहे .ते किती माळ्याचे आहे हे माहीत नाही पण त्या बस्थानकाचे वरच्या माळ्यावर लॉजिंगची व्यवस्था असावी लिफ्ट ची सोय असावी असे केले तर बाहेर गाव हुन येणाऱ्या प्रवाश्यांचा गैरसोय होणार नाही .बस नाही ह्या कारणाने जे प्रवासी रात्री लॉज मध्ये थांबतात त्यांना सोयीचे होईल करीता मा मुख्यमंत्री ह्यांना ग्राहक प्रहार संघटने च्या वतीने निवेदन पाठवण्यात आले असून ह्या निवेदनावर जिल्हा अध्यक्ष डॉ राजेंद्र आत्राम,कार्याध्यक्ष दामोधर बाजोरीया, जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर, जिल्हा संघटक बंडुभाऊ लवटे, उपाध्यक्ष यशवंत काळे ,कोशाध्यक्ष सुनील धवने,सहसचिव भैय्यासाहेब ठमके,पाटनबोरी सर्कल प्रमुख जयवंत बावणे,झरी जामनी सर्कल प्रमुख मनोहर गेडाम,राळेगाव सर्कल प्रमुख दिलीप वाढई,घाटंजी सर्कल प्रमुख कृतनजय देशपांडे ,मारेगाव सर्कल प्रमुख सचिन मेश्राम ,अजय दुम्मनवार,विनोदसेठ चमेडीया सह अनेक कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत . आपला प्रसाद नावलेकर

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.