WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आदर्शराज्य, रयतेचे राज्य साकारणारे, महापुरुष शत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक गढकिल्ले विक्रीकरु पाहणाऱ्या शुद्रविचाराचे राज्यकर्ते यांचा निषेध. - गीत घोष

Image

नुकताच येथील महापुरुषांच्या विचारधारेचे महाशत्रु राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक गढकिल्ले विकून राज्य व देशाच्या तिजोरीत पैसा भरुन विकास करण्याचा अत्यंत शुद्र विचार जाहिर केला आहे. ईथे आश्चर्याची गोष्ट म्हणजे या राज्यकर्त्यांनी या अगोदर आम्ही 'सत्तेत आलोतर शिवाजी महाराजांच्या विचाराचे रयतेचे राज्य पुणर्स्थापीत करु व आमचा राज्यकारभर हा शिवाजी महारांच्या आदर्शावर आम्ही चालवु' असे फोलकट आस्वासन देवून आदर्श राज्याची दिव्यस्वप्न राज्यकर्त्यांनी या देशातील जनतेला दिले होते. यावर विश्वास ठेवून लोकांनी यांना सत्तेत बसविले व पुर्ण सत्ता त्यांचेकडे सोपवली, आता तेच मनूवादी राज्यकर्ते आता आपल्या आदर्श महापुरुष शिवाजी महाराज यांचे ऐतिहासिक गढकिल्ले हे कमाईचे साधन ठरवून आमच्या आदर्शाची निर्लज्यपणे धिंड काढत असतांना दिसत आहेत विशेष उल्लेखीय, तरी आम्ही स्वस्थ बसलो आहोत. केवळ माध्यमातून निषेध नोंदवून आम्ही शिवाजी महाराजांचे खरे भक्त किंवा खरे पाईक असल्याचे सिध्द होत नाही तर, अशा मनूवादी विचारधारेच्या लोकांच्या ताब्यात असलेली राज्यसत्ता त्यांच्या हातातून हिसकावून घेतली पाहिजे व भविष्यात अशा शुद्र राज्यकर्त्यांच्या हातात पुन्हा सत्ता जाणारच नाही असी आम्ही प्रतिज्ञा घेतली पाहिजे तरच आम्ही छत्रपति शिवाजी महाराजांचे खरे वारस, अनुयायी ठरु!

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......