WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी सह रंगनाथ नगर परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट.....

Image

प्रतिनिधी सुरज चाटे :-
अल्पवयीन चोरांच्या समावेशाची शक्यता :- भुरट्या चोरांचा बंदोबस्ताची मागणी .....

गेल्या काही दिवसअगोदार चोऱ्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने अशा चोरावर कारवाईचा बडगा वणी पोलिसांकडून उगारण्यात आला होता, आता या चोरटयांनी आपला मार्ग मोठ्या वर न वळवता छोट्या घरावर सुद्धा सुरू केल्याने अशा भुरट्या चोरावर कारवाईची गरज निर्माण झाल्याचे दिसून येत आहे, असाच एक प्रकार दिनांक 14 च्या मध्यरात्री घडला असून अजय ठोंबरे यांच्या घरून चक्क सायकल ची चोरी झाल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.

वणी सह रंगनाथ नगर परिसर चोऱ्याच्या प्रमाणात वाढ होत असून दिवसागणिक चोर आपली आखणी करून रात्रीचा डाव साधून चोरी करून रातोरात चोरीचा माल भंगार दुकान व आदींना देत पैसे घेत असल्याचे चित्र नाकारता येत नाही रंगनाथ नगर परिसरात असाच एक प्रकार घडून आला असून अजय ठोंबरे यांच्या मालकीची सायकल त्यांच्या घराच्या समोर असताना दिनांक 14 च्या मध्यरात्री ज्या सायकलीला साखळी ने बांधलेले असताना त्याला कुलूप लावून असताना चक्क साखळी तोडून चोरट्याने त्या सायकलीवर डल्ला मारल्याचा प्रकार दिनांक 15 ला पहाटेच्या दरम्यान निदर्शनास आला आहे.

वणी पोलीस विभागाने अशा भुरट्या चोरांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली असून यात अल्पवयीन चोरांचा सुद्धा समावेश असण्याचे संकेत असून अशा भुरट्या चोरावर जर वेळीस आळा घातला नाही तर सदर परीसरातील चोऱ्यांच्या प्रमाणात कमालीची वाढ होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असून तातडीने अशा भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परीसरात जोर धरत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले