WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भक्ती गीत व नृत्य स्पर्धा कलावंतानी गाजवली..... सूर वीरांनी रसिकांना जिंकले

ImageImage

संस्कार भारतीच्या वणीशाखेच्या वतीने स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी भक्ती गीत गायन व भक्ती गीत नृत्य स्पर्धा संपन्न झाली. ब गटात दिगंबर ठाकरे यांनी प्रथम क्रमांक , अपूर्वा किटकुले द्वितीय व अजिंक्य तायडे यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाले. तर अ गटात प्रथम अंजुला पावडे, द्वितीय युवराज लोया आणि तृतीय अनुष्का कळसकर यांना पुरस्कार प्राप्त झाले.

नृत्य स्पर्धेत बाल गटात सानिका बुटले, नियती बुटले आणि अदिती अणे, तर वरिष्ठ गटात प्राची बहादुरे, परी जोगी आणि तनिष्का कळसकर यांना रोटरी चे अध्यक्ष अनिल उत्तरवार, जेष्ठ रंगकर्मी अशोक सोनटक्के, महालक्ष्मी इन्फोटेक चे सुरेंद्र नालमवार, समिती अध्यक्ष कविता चटकी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.

यादरम्यान मारेगावं येथे कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. हेमंत चौधरी यांचा समिती तर्फे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय च्या वतीने यवतमाळ केंद्रावर पु ल देशपांडे यांच्या साहित्यावर एकपात्री स्पर्धा घेण्यात आली व प्रथम क्रमांक पटकावला तसेच मुंबई येथे सादरीकरण केले आणि ब दर्जा कलावंत प्राप्त केला यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला.

गीत गायन स्पर्धेचे परीक्षण कविता सातपुते, विद्या खंडारे आणि रुपाली हिवरकर यांनी केले असून नृत्य स्पर्धेचे परीक्षण आकाश बोथले, भारती लोहबडे, दीपक कोवे यांनी केले. कार्यक्रमाला विशेष सहकार्य नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, नगरसेवक नितीन चहानकर, अमित उपाध्ये, शैलेश ढोके, तिरुपती मंगल कार्यलय, सुमन साऊंड डेकोरेशन, बळीराजा पक्ष्याचा संगीता खटोड यांचे लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिलाष राजूरकर , शंतनू मुने, अजित खंदारे, अक्षय करसे, अतुल डफ, भूषण काटकर, रुपाली सालकाडे, राणी हांडे, वनिता काकडे, निकिता बोबडे यांच्यासह संस्कार भारतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.