WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत बाल कलावंत स्वरा ठेंगडी हीचे शिवचरित्र कथन

Image

वणी येथील जैताई देवस्थान मध्ये दि. 1 ते 6 ऑक्टोबर पर्य॔त आयोजित सुश्राव्य कार्यक्रमांमध्ये दि. 5 ऑक्टोबर शनिवार रोजी रात्री 8 वाजता नागपूर येथील बाल कलावंत कु. स्वरा राहुल ठेंगडी हीच्या शिवचरित्र कथनाचा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. ती 7 व्या वर्गात शिकत असून , तिचे वय 13 वर्षे आहे.आपल्या 90 मिनिटांच्या शिवचरित्र कथनाने ती श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत असते. वक्तृत्व स्पर्धेतील अनेक पारितोषिके तिने प्राप्त केली असून शालेय अभ्यासातील तिची प्रगति अभिनंदनीय आहे. शिवाजी महाराजांचे बहुतांशी महत्वाचे किल्ले तिने पाहिले व अनुभवले आहेत. " रायगडाला जेव्हा जाग येते " या नाटकातील तिच्या संभाजी या व्यक्तिरेखेला एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले आहे. शिवचरित्रा कथनाचे तिचे आता पर्यंत बावीस कार्यक्रम झाले असून तिच्या या कार्यक्रमा बद्दल केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तिचा नुकताच सत्कार झाला . स्वरा ही नागपूर मधील ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर ठेंगडी यांची नात आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......