WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अजब चोरीची गजब कहाणी .....

ImageImageImageImage

चोरीचा डाव फसला : चोराला दिला नागरिकांनी चोप.....

वणी :- सुरज चाटे प्रतिनिधी

वणीसह परिसरात चोरांचे प्रमाण वाढले असून आता या चोरांनी आपला मोर्चा गल्लोगल्ली कडे ओढला आहे, दिनांक 15 ला मध्यरात्रीच्या दरम्यान 2 चोरटे सुतार पुरा परिसरात घुसून चक्क एका इमारतीत शिरले आणि त्यानंतर जो थरार घडला ती म्हणजे अजब चोरीची गजब कहाणी असेच या घटनेतून दिसून येत असून चोराला नागरिकांनी घटनास्थळी चोप दिला असून चोराने काही वेळापूरते वेड्याचे सुद्धा सोंग घेतले होते. तर या चोराला मध्यरात्री बांधून ठेऊन सकाळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले त्यानंतर पोलिसांनी आपली कारवाई केली.

वणीत दिवसाढवळ्या चोरीच्या घटनांचा दम वाढत असून आता चक्क इमारतीत घुसून चोरी करून रफुचक्कर होण्याच्या मार्गावर असताना चोरांचा हा डाव फसल्याची घटना निदर्शनास आली असून दिनांक 15 च्या मध्यरात्री 2 वाजताच्या दरम्यान 2 अनोळखी चोर सुतार पुरा परिसरात येऊन मंदा लामगे यांच्या घरी भाड्याने राहत असंलेले चार मुले हे गाळ झोपेत असताना त्यातील एक मुलगा मूत्रविसर्जना करिता मध्यरात्री उठला व तो बाथरूम मध्ये असताना मंगेश नामक चोराने मोकळा दरवाजा पाहून आपला डाव साधला त्याला वाटले की या घरात सगळे झोपून आहे व येथे हाथ मारून निघणे सोपे जाईल दरम्यान त्याने खोलीच्या आत प्रवेश केला व दरवाजा आतून बंद केला त्यातच जो विधी आटपविण्याकरिता गेलेल्या युवकाची विधी आटपून झाल्यावर मी दरवाजा खुला सोडला होता दरवाजा लावला कोणी असा विचार येत त्यांनी दरवाजा ठोकण्यास सुरुवात केली व त्याचे बाकी 3 साथी जागे झाले व त्याने दरवाजा ठोकत असल्याचे पाहता आपल्या खोलीत कोण शिरलंय हे पाहले असता त्याला अनोळखी व्यक्ती दिसून आला दरम्यान तो चोर असल्याचे निदर्शनास आले व बाहेरील व्यक्ती आपला मित्र असून सदर चोराला त्यांनी विचारपूस करून परिसर जागा केला घरमालकाना उठविले व सदर घटना सांगितले चोराला त्याचे हातपाय बांधून ठेऊन सकाळ पर्यंत त्याला तसेच ठेवले व पहाटे पोलिसांच्या स्वाधीन केले.

दरम्यान चोरी करण्याकरिता आलेले दोन युवकांपैकी एक फसला मात्र एक त्याला चोप बसत असल्याचे पाहून रस्त्यावरूनच पडून गेल्याचे नागरिकांनी सांगितले. पहाटे च्या दरम्यान सदर चोराच्या बचावासाठी त्याची आई व त्याची आत्या चोर हा मानसिक असल्याची बतावणी करून त्याला सोडा हा मानसिक आहे, त्यामुळे हा असे प्रकार करतो अशी बतावणी करीत होते परंतु नागरिकांनी पोलीस येत पर्यंत त्यांना सोडले नाही, अखेर सदर मंगेश नामक चोराला पोलिसांच्या स्वाधीन केले.

एकाच ठिकाणी दुसऱ्यांदा चोरी...

सदर ठिकाणी दोन महिन्या अगोदर चोरीची घटना घडली असून आता आणखी याच ठिकाणी त्याच खोलीत चोर घुसल्याने हा परिसर चोरांचा टार्गेट तर नाही ना असे परिसरात बोलल्या जात असून अशा चोरांवर अंकुश लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले