WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वनाधिकार कायद्याच्या सुधारित 2012 च्या कायद्यानुसार दावे पात्र करावे --- कॉम्रेड शंकरराव दानव

Image

_____________________

पाटणबोरी : वनजमिनीवर पारंपरिक शेती करणारे आदिवासी व बिगर आदिवासी यांना हक्काची जमीन मिळावी यासाठी कम्युनिस्ट पक्षांच्या रेट्याखाली 2006 साली वनाधिकार कायदा तयार करण्यात आला, परंतु कायद्याची अंमलबजावणी गेल्या 13 वर्षात केली नाही. त्यासाठी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या सततच्या आंदोलनाने कायद्यात सुधारणा करून फक्त 2 पुराव्यावर जमिनीच्या पट्टा देण्यात यावा असा कायदा केला. असे असतानाही प्रशासनाकडून ह्याकडे दुर्लक्ष करून दावे फेटाळून लावले जाते, करीता 2012 च्या सुधारित नियमाने दावे पात्र करावे अन्यथा किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मोठे आंदोलन उभारेल वकार्यकर्त्यांनी त्यासाठी तयार राहावे असे आवाहन येथील आदिवासी समाज सभागृहात झालेल्या किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विशेष सभेत माकपचे राज्य कमिटी सदस्य कॉम्रेड शंकरराव दानव यांनी केले.

या विशेष सभेला माकपचे जिल्हा सचिव कॉ कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ चंद्रशेखर सिडाम,जि क सदस्य कॉ उरकुडा गेडाम यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.

या विशेष सभेत अनेक विषयांवर चर्चा करन्यासोबत विधानसभा निवडणुकीवर ही चर्चा करून निर्णय घेण्यात आले. या सभेत पाटणबोरी सर्कल मधील अनेक गावातील कार्यकर्ते हजर होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले