WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सागर झेप संस्थेच्या वतीने वृक्षारोपण....

Image

वणी : येथील समाजकार्य व सांस्कृतिक क्षेत्रात दोन वर्षांपासून कार्यरत आहे. रोटरी क्लब वणीचे अध्यक्ष अनिल उत्तरवार, सचिव निकेत गुप्ता , शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अशोक सोनटक्के, संस्कार भारती समितीच्या अध्यक्ष कविता चटकी, झी किडझी चे संचालक प्रवीण सातपुते यांचे हस्ते पोस्ट कॉलनी येथे वृक्षारोपण करण्यात आले. परिसरात वृक्ष तोड होत असून प्रदूषण वाढत आहे. हे थांबवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परिसरात एक झाड लावून त्याचे संगोपन करणे आवश्यक आहे. याकरीता उपक्रम सुरू केला आहे. या संस्थे द्वारे सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येतात. या वेळी सागर झेप संस्थेचे अध्यक्ष सागर मुने, मंगेश गोहोकार, गणेश मत्ते, नाना केळकर आदी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले