WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भारतीय सैन्यात असलेल्या राजूर कॉलरी येथील जवनाचा अपघाती मृत्यू...राजूर येथे मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले ...

Image

वणी:तालुक्यातील राजूर कॉलरी येथील भारतीय भु-सैन्य दलात असलेले 34 वर्षीय जवनाचा गुरुवार दि.26/09/2019 ला रात्री 10:30 वाजताचे सुमारास मथुरा येथे अपघाती मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.या जवानावर यवतमाळ जिल्ह्यातील मूळ गाव राजूर कॉलरी येथे मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

वणी तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या राजूर कॉलरी येथील नरेंद्र लक्ष्मण सोलंकी हे भारतीय सैन्यात कार्यरत होते. भु-सैन्य दलात कार्यरत असलेल्या नरेंद्र यांची सेवेचा करार जवळपास संपतच आला होता.गुरुवारी रात्री मथुरा येथे दुचाकीने जात असताना नरेंद्र यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.नरेंद्रच्या पश्चात पत्नी,एक मुलगा व मुलगी आहे.

या घटनेची माहिती मिळताच नरेंद्र यांचे कुटुंब राजूर येथून मथुरेकडे रवाना झाले.रविवार दि.29/09/2019 ला सकाळी 9 वाजता त्यांचे पार्थिव शरीर राजूर येथील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवले होते.या सैनिकाला आदरांजली देण्यासाठी अलोट गर्दी झाली होती. भारतीय भु-सैन्य दल व महाराष्ट्र पोलिसाच्या यवतमाळ पथकातर्फे मानवंदना देण्यात आली.सर्वांना परिचित असलेला वीर जवान नरेंद्रला अखेरचा निरोप देण्यात आला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.