WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नामांकन भरले आता, तू जा मी थांबतो?....

Image

लॉबी चालणार काय? :-

पाच वर्ष जनतेचं तोंड न पाहलेले उमेदवार जनता जनार्दनाच्या दारी...

वणी :- सुरज चाटे प्रतिनिधी

वणी विधानसभेच्या सध्याच्या परिस्थिती नुसार आता सर्व वातावरण तापून असले तरी युती व आघाडी मुळे उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये रोषअसला तरी इतरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून काहीनी सुद्धा गेल्या पाच वर्षात जनतेशी साधा सवांद सुद्धा साधला नाही असे देखील आता जनता जनार्दनाच्या आशीर्वाद घेण्यासाठी दारोदारी जाणार असून जनतेनी सुद्धा आपापल्या पद्धतीने उदहारणाचे बोचके बांधून तयार ठेवले असून येऊ तर दे मग पाहतो? असे सुद्धा जनमानसात बोलल्या जात असून कुण्या चेहऱ्यांना नवी संधी मिडणार हे मात्र अस्पष्ट दिसत असून लॉबी चालणार काय? हा सुद्धा चर्चेचा विषय बनला आहे, जो तो आपली कंबर कासताना दिसत आहे.

वणी विधानसभा क्षेत्राकरिता अनेक दिगज्ज विधानसभेच्या रिंगणात असून अनेकांनी अजून पर्यंत गत पाच वर्षात जनता जनार्धनाच्या अवती भवती संपर्क तर सोडाच साधं तोंड सुद्धा दाखवलं नाही फेरफटका सुद्धा मारताना कधी नगरात दिसले नाही असे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने अशांना धडा शिकविणार असल्याचे सुद्धा मतदार राज्यांकडून दबक्या आवाजात बोलल्या जात आहे परंतु ज्यांनी खरच कार्य दमदार केले आहे तोच खरा वणी विधानसभेचा बाजीगर असल्याचे सुद्धा वणी विधानसभेतील जनतेकडून बोलल्या जात आहे.

वणी विधानसभा हे विविध पक्षातील राजनेत्यांची विधानसभा म्हणून परिचित आहे त्यामुळे आता नेमका बाजीगर कोण हे देखील आता मतदार राजा ठरविणार असून निवडणूक झाल्यानंतर माणसांनी माणुसकी न विसरावे असे देखील मतदारांकडून आगळी वेगळी भूमिका बोलताना दिसत आहे, असे असताना लॉबी चालणार काय? तू जा मी थांबतो? असे होणार काय? की पुन्हा काही समीकरण बदलणार? विविध चर्चांना उधाण आल्याने दिनांक 7 ला अर्ज मागे घेण्याची तारीख असल्याने कोण अर्ज मागे घेणार याकडे मात्र लक्ष लागले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.